ही आंध्रदेशीय पाककृती अनेक वेळा करून – “ट्राईड अँड टेस्टेड” अशी आहे.
अनेक पायर्या असल्यामुळे कदाचित किचकट आणि वेळखाऊ वाटण्याची शक्यता आहे पण जर त्या पायर्या जशाच्या तशा करत गेलात तर निकाल हमखास बरोबर येणार हे नक्की(न झाल्यास पैसे परत ).
अजून एक म्हणजे हा पदार्थ एखादी निवांत दुपार हाताशी असेल तरच करा. घाई-घाईत केल्यास/पायर्या गाळल्यास चव हमखास बिघडेल.
कच्चा माल :
चिकन १ किलो हाडांसकट – बोटभर तुकडे करून
४ टेबलस्पून तेल
१ १/२ टेबलस्पून तिखट
१/२ टेबलस्पून हळद
१ १/२ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
३ लिंबांचा रस – २/३ मिनिटे गरम करून थंड केलेला.
मिठ – चवीनुसार
मसाला
३ टेबलस्पून धणे
१ टेबलस्पून जिरं
१ १/२ टेबलस्पून मेथी बी (मेथ्या?)
१ टेबलस्पून खसखस
२ इंच दालचिनी तुकडा
५ लवंगा
१ चक्रीफूल
१ वेलदोडा
फोडणीचे साहित्य
पाऊण कप तेल
दोन चिमूट मेथ्या
१२-१५ पाकळ्या लसूण – साधारण ठेचून
२०-२५ कढीलिंबाची पाने
३-४ लाल मिरच्या
कृती
१. जड बुडाच्या कढईत मंद आचेवर मसाल्याचे पदार्थ वेगवेगळे २-४ मिनिटे कोरडे भाजून(तेलाशिवाय) घ्यावेत. सुंदर सुवास सुटला पाहिजे पण पदार्थ करपता कामा नये.
भाजल्या नंतर कढईतून बाजूला काढून थंड करावे. मग वस्त्रगाळ दळून घ्यावेत.
२. ४ टे. स्पू. तेल त्याच कढईत गरम करावे. त्यात आलं-लसूण पेस्ट, चिकन, तिखट, हळद आणि मिठ घालून चांगले मोठ्या आचेवर ५ मि. परतून घ्यावे. आच कमी करून मध्यम आचेवर चिकन पूर्ण शिजू द्यावे (म्हणजे पाणी संपून तेल सुटले पाहिजे). ह्याला पायरीला एकूण साधारण २०-२५ मिनिटे लागतात.
३. दुसर्या जड बुडाच्या भांड्यात पाऊण कप तेल गरम करा. त्यात कढिलिंब, लसूण पाकळ्या, मिरच्या आणि मेथ्या मिनिटभर परता. नंतर शिजवलेले चिकनचे तुकडे, उरलेली ग्रेव्ही असं सगळं एकत्र करा आणि १५ मि. मध्यम आचेवर शिजवा.
४. गॅस लहान करून (तापवून थंड केलेला) लिंबाचा रस घाला. व्यवस्थित हलवून घ्या. गॅस बंद करा. चिकन थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रिज मधे ठेवा.
वि.सू: १. लिंबाचा रस तापवुन थंड करणे अतिशय महत्वाचे आहे.
२. फ्रिज शिवाय बाहेर लोणचं ठेवायचे असेल तर ३र्या पायरीत तेल थोडं जास्त(म्हणजे बरणीत काढून ठेवल्यावर लोणच्यावर दोन बोटं तेलाचा थर राहिल इतपत.) वापरा. हे लोणचं फ्रिज मधे २०-२५ दिवस सहज टिकतं. मी बाहेर ठेवून बघितलं नाही (किंबहूना उरलंच नाहीये )
३. दुसर्या पायरीत २०-२५ मि. शिजवलेलं चिकन काही लोकांना रबरी वाटेल. तसं असेल तर ५ मिनिटे कमी शिजवलं तरी चालेल.
हे लोणचं दही-भात, डोसा, पोळीबरोबर अफलातून लागतं.
Hi this is your friendly neighborhood recipe collector.
can you answer this one?
४. गॅस लहान करून (तापवून थंड केलेला) लिंबाचा रस घाला. व्यवस्थित हलवून घ्या. गॅस बंद करा. चिकन थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रिज मधे ठेवा.
Hi there:
As we discussed over phone, heating is really needed to keep the taste for long time,