Kher.org::Blog
चिंटू वापस हाजिर है
सकाळने esakal.com ह्या संकेतस्थळाचे स्वरुप बदललेले आहे.
ह्या बदलानंतर मध्यंतरी खंडीत झालेला  चिंटू RSS Feed पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी हाजिर आहे!
तुम्ही तुमच्या आवडत्या फीड रिडर उदा गुगल रिडर इ. मधे हा दुवा जोडू शकता. पर्यायी व्यवस्था म्हणून इथे आपला विरोप पत्ता भरुन रोज चिंटू विरोपाद्वारे देखील मिळू शकतो.
अजुन तरी हे संकेतस्थळ प्रायोगिक रुपातच असल्यामुळे  चिंटू RSS Feed च्या स्वरुपात काही दिवस उपलब्ध होवू शकणार नाही असे दिसते.
वि. सू. चिंटू मालिकेचे सर्व हक्क निर्माते चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर ह्यांच्या आधीन आहेत.
(दक्षिणेकडची खव्वयेगिरी – २) अप्पम् व व्हेजिटेबल स्ट्यु
पुडक्यातले केळीच्या हिरव्यागार पानात गुंडाळलेले  वाफाळते जाळीदार अप्पम आणि सोबत खमंग गरमा-गरम मुट्टै हा एक न्याहारीचा स्वर्गीय प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तसंही  केरळला “गॉडस्  ओन कंट्री” असंच म्हणतात म्हणा ( आता तिकडच्या लोकांना “डेव्हिलस् ओन पिपल” म्हणतात ते जाउद्या ).  मल्याळी कट्टर ब्राम्हणी (नंबियार वगैरे) घरात मुट्टैला( म्हणजे अंडाकरी) स्ट्यु हा एक उत्तम पर्याय असतो.
असो. आठवणींत अधिक न रमता लुसलुशीत आणि नाजूक जाळीदार अप्पम्  बनविणे किती सोपं आहे ते बघूया.
साहित्य:
दोन वाट्या तांदुळ
पाव वाटी  शिजवलेला भात (पाण्यात भिजवून उबदार जागी ठेवावा)/ पोहे
१/२ वाटी खोवलेले खोबरे. चिमुटभर यीस्ट सिद्ध करून(मूळ पाकृ.त ताडी (हो, ताडीच! )वापरतात).
२ टे. स्पू. साखर.
कृती:
तांदूळ प्रथम आठ-दहा तास पाण्यात भिजत घालावेत. नंतर ते तांदूळ, खोबरं, आणि भात किंवा पोहे असं सगळं अगदी गंध वाटून घ्यावेत. वाटताना पाणी अगदी कमी घालावे(वाटले जाईल इतपतच). नंतर यीस्ट आणि साखर वाटणात घालून नीट हलवून घ्यावे. उबदार जागी मोठ्या भांड्यात ८-१० तास झाकून ठेवावे (मिश्रण खूप फुगते त्यामुळे भांडे छोटे घेतले तर नक्की उतू जाईल).
अप्पम करायच्या आधी फुगलेल्या पीठात चवीनुसार मीठ आणि गरजे नुसार पाणी/दूध घालून ते पातळ करून, नीट हलवून घ्यावे. पीठ इडलीच्या पीठाएव्हढे घट्ट/पातळ  असावे.
तेलाचा हात फिरवून अप्पम पॅन (मी लोखंडाची कढई वापरली) मधे पळीभर पीठ घालावे आणी चटकन कढईचे कान धरून ४५अंशाच्या कोनातून फिरवावे म्हणजे पीठ नीट पसरेल (पीठ पसरवायला पळी वापरू नये). आवडत असल्यास अप्पमच्या खळग्यात थोडे दूध घालावे. बशीच्या आकारातले  अप्पम शिजल्यावर कडा सुटून यायला पाहिजेत. गरमा गरम अप्पम व्हेजिटेबल स्ट्यु सोबत वाढावे.
व्हेजिटेबल स्ट्यु साहित्य :
१ मोठा कांदा, पातळ चिरून
२-३  हिरव्या मिरच्या तुकडे करून
१/२  टेस्पू. आलं-लसूण पेस्ट
एखादी काडी कढिलिंब
१ बटाटा चौकोनी तुकडे करून
१ गाजर तुकडे करून
थोडेसे मटार
अननस (ऐच्छिक)
नारळाचे घट्ट  दूध – १/४ वाटी
नारळाचे पातळ दूध – १ वाटी
२-३ टेस्पू. तेल
खडा मसाला – २ इंच दालचिनी, ५-६ लवंगा,  ४-५ काळे मिरे , एखादं चक्री फूल, १-२ वेलदोडे
चवी प्रमाणे मीठ
कृती:
तेल गरम करून खडा मसाला थोडा परतून घ्यावा.  नंतर कांदा, आलं लसूण पेस्ट, मिरची आणि कढीलिंब टाकून कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा.  त्यात भाज्या, असल्यास अननस घालून मिनिटभर परतून घ्याव्यात.  नारळाचे पातळ दूध घालून भाज्या शिजू द्याव्यात (१०-१२ मि.)
शेवटी शिजताना नारळाचे घट्ट दूध धालून २-४ मिनीटे उकळी आणावी.. अप्पम बरोबर स्ट्यु तयार आहे.
(दक्षिणेकडची खव्वयेगिरी – १) कोडी पचडी - चिकनचे लोणचे
अनेक पायर्‍या असल्यामुळे कदाचित किचकट आणि वेळखाऊ वाटण्याची शक्यता आहे पण जर त्या पायर्‍या जशाच्या तशा करत गेलात तर निकाल हमखास बरोबर येणार हे नक्की(न झाल्यास पैसे परत :) ).
अजून एक म्हणजे हा पदार्थ एखादी निवांत दुपार हाताशी असेल तरच करा. घाई-घाईत केल्यास/पायर्‍या गाळल्यास चव हमखास बिघडेल.
कच्चा माल :
चिकन १ किलो हाडांसकट - बोटभर तुकडे करून
४ टेबलस्पून तेल
१ १/२ टेबलस्पून तिखट
१/२ टेबलस्पून हळद
१ १/२ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
३ लिंबांचा रस - २/३ मिनिटे गरम करून थंड केलेला.
मिठ - चवीनुसार
मसाला
३ टेबलस्पून धणे
१ टेबलस्पून जिरं
१ १/२ टेबलस्पून मेथी बी (मेथ्या?)
१ टेबलस्पून खसखस
२ इंच दालचिनी तुकडा
५ लवंगा
१ चक्रीफूल
१ वेलदोडा
फोडणीचे साहित्य
पाऊण कप तेल
दोन चिमूट मेथ्या
१२-१५ पाकळ्या लसूण - साधारण ठेचून
२०-२५ कढीलिंबाची पाने
३-४ लाल मिरच्या
कृती
१. जड बुडाच्या कढईत मंद आचेवर मसाल्याचे पदार्थ वेगवेगळे २-४ मिनिटे कोरडे भाजून(तेलाशिवाय) घ्यावेत. सुंदर सुवास सुटला पाहिजे पण पदार्थ करपता कामा नये.
भाजल्या नंतर कढईतून बाजूला काढून थंड करावे. मग वस्त्रगाळ दळून घ्यावेत.
२. ४ टे. स्पू. तेल त्याच कढईत गरम करावे. त्यात आलं-लसूण पेस्ट, चिकन, तिखट, हळद आणि मिठ घालून चांगले मोठ्या आचेवर ५ मि. परतून घ्यावे. आच कमी करून मध्यम आचेवर चिकन पूर्ण शिजू द्यावे (म्हणजे पाणी संपून तेल सुटले पाहिजे).  ह्याला पायरीला एकूण साधारण २०-२५ मिनिटे लागतात.
३. दुसर्‍या जड बुडाच्या भांड्यात पाऊण कप तेल गरम करा. त्यात कढिलिंब, लसूण पाकळ्या, मिरच्या आणि मेथ्या मिनिटभर परता. नंतर शिजवलेले चिकनचे तुकडे, उरलेली ग्रेव्ही असं सगळं एकत्र करा आणि १५ मि. मध्यम आचेवर शिजवा.
४. गॅस लहान करून (तापवून थंड केलेला) लिंबाचा रस घाला. व्यवस्थित हलवून घ्या. गॅस बंद करा. चिकन थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रिज मधे ठेवा.
वि.सू: १. लिंबाचा रस तापवुन थंड करणे अतिशय महत्वाचे आहे.
२. फ्रिज शिवाय बाहेर लोणचं ठेवायचे असेल तर ३र्‍या पायरीत तेल थोडं जास्त(म्हणजे बरणीत काढून ठेवल्यावर लोणच्यावर दोन बोटं तेलाचा थर राहिल इतपत.) वापरा. हे लोणचं फ्रिज मधे २०-२५ दिवस सहज टिकतं. मी बाहेर ठेवून बघितलं नाही (किंबहूना उरलंच नाहीये :D )
३. दुसर्‍या पायरीत २०-२५ मि. शिजवलेलं चिकन काही लोकांना रबरी वाटेल. तसं असेल तर ५ मिनिटे कमी शिजवलं तरी चालेल.
हे लोणचं दही-भात, डोसा, पोळीबरोबर अफलातून लागतं.
Python GTK2.0+ : ClearWeather Screenlet
Ubuntu has a open source code(under GPL) and rich variety of applications to choose from.
The user/developer community is also very large and responsive.
With such environment an itch to dabble in and customize things is tempting.
It was Screenlets that has got me started in this dabbling.
Screenlets allow you to make a floating accessories or widgets on your desktop.
The things that can be done with the Screenlets are endless. For instance, I use Radio Screenlet to listen to BBC News while a weather screenlet gives upto-minute information of the weather outside.
These widgets are based on Screenlet class library (Python GTK based).
Today I modified the ClearWeather Screenlet (Version 0.5 by Whise). The new features are :
1. Updated the screen for more crisp display
2. Added "Update Interval" field. The user can specify the interval for fetching latest XML feed. In the original version it was fixed to 5 minutes.
3. Screenlet now shows a detailed information on mouse over
The updated version can be found here.
Here is a screen shot:
Screenlet manager (ALT-F2 -> screenlets)  can install the new version from this tar.gz archive automatically.
If you do not want that, you may simply drop the ClearWeather.py in the ClearWeather Screenlet directory.
Enjoy!
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
येणारे नवीन वर्ष आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना आनंदाचे आणि भरभराटीचे जावो!
सस्नेह!
पुस्तक परिचय -"कॉफी ट्रेडर"
भावाच्या घरात, ओलीने आणि कुबट हवेने भरलेल्या अंधार्‍या तळघरात उधारीवर राहताना मायगेलला भविष्यात फक्त निराशेचा मिट्ट काळोखच दिसतोय. दरम्यान अवचितच त्याची एका भुरळ पाडणार्‍या डच स्त्रीशी - गर्ट्र्युडशी ओळख होते. एकदा, गर्ट्र्युड पुर्वी कधी न चाखलेल्या पण एकदा प्यायल्यावर चटक लावणार्‍या कॉफीची चव मायगेलला देते.
आणि दोघे मिळून एक महत्वाकांक्षी योजना आखतात - इतर व्यापार्‍यांना सुगावा लागण्या आधीच ह्या जादुई पदार्थाचा संपुर्ण युरोपात दणकून प्रचार करायचा आणि कॉफीच्या व्यापारावर पुर्ण कब्जा मिळवायचा! बेत यशस्वी झाला तर मग अनेक पिढ्या बसून खातील एव्ह्ढ्या पैशांचे ढिग आपल्या पायांनी चालत येणार! मात्र त्यासाठी मायगेलला आपले कौशल्य आणि बाजारतली पत पणाला लावावे लागेल! शिवाय मधाळ बोलीने, केसांनी गळा कापणारे मैत्रीचा आव आणणारे कट्टर शत्रू जागोजागी टिपून बसले आहेत!
डेव्हिड लिस नावाचा उगवत्या ब्रिटिश लेखकाची "कॉफी ट्रेडर" ही दुसरीच पण क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणारी कादंबरी आहे.
१७व्या शतकातल्या युरोपियन व्यापार्‍यांची पंढरी असणार्‍या अ‍ॅमस्टरडॅम शहरात हे कथानक घडते. अनेक जाती-धर्माचे रिती रिवाजांचे व्यापारी तिथे ट्युलीपची फुले, चॉकोलेट, मसाल्यांचे पदार्थ, रेशिम अशा अनेकाविध गोष्टींची उलाढाल करायचे. जगाच्या कानकोपर्‍यातून अ‍ॅमस्टेल नदीच्या तीरी, गोदामांत माल यायचा आणि मायगेल सारख्या चलाख व्यापार्‍यांच्या हाती म्हणता म्हणता खपून जायचा!
आपला नायक आहे जन्माने "पोर्तुगीज ज्यु". इतर वेळी धर्माचे कट्टर पालन करणारा पण व्यापारात सर्व विधीनिषेध बाजूला ठेवणारा त्याचा हा छोटासा समाज पैसा मिळवण्याच्या सगळ्या युक्त्या-प्रयुक्त्या कोळून प्यायला होता -काहिसा धंदापाण्यात कुशल असलेल्या मारवाडी बनियांसारखा. त्या समाजातल्या रोजच्या जीवनातल्या घटना, हेवेदावे, प्रेमप्रकरणे, झटपट श्रीमंती आणि छानछोकीत राहण्यासाठी चालणारी धडपड ह्याचे मनोरंजक चित्रण आपल्याला कॉफी ट्रेडर मधे दिसते.
मायगेलचे डावपेच, नानाविध अडचणी, नशीबाने दिलेला हात अशा अनेक घटनांमधून कथानक पुढे सरकत राहते.
आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग असणारा शेअर बाजार, फ्युचरस् आणि अडत या गोष्टींचा पाया इथे रचला गेला. तो शेअर बाजार सुद्धा कथेत अनेक वेळा डोकावून जातो. तिथल्या एजंटांच्या आरोळ्या, घटकेत वर-खाली होणारे भाव, गिर्‍हाईकाला गटवून जास्तीत जास्त फायदा कसा होईल ह्या विवंचनेत असणारे अडते आणि चढ्या भावात कर्ज देणारे सावकार यांच सहसा कादंबर्‍यांमधून न दिसणारे जिवंत चित्र कॉफी ट्रेडर मधे बघायला मिळते.
पुस्तकाच्या शेवटी लेखकाची मुलाखत आहे. त्यात पुस्तक लिहिण्याची प्रेरणा (डिग्रीला असताना केलेला अभ्यास/संशोधन), "कॉफी"ची निवड आणि एकूण आर्थिक थरारकथा (फायनान्शियल थ्रिलर)ह्या धाटणी(जेनेर) मागचा विचार विस्ताराने येतो.
'गारंबीच्या बापू'त असं वातावरण बापूच्या सुपारी-व्यापारात येते खरे पण ते साम्य तितपतच आहे.
शेवटी मायगेल कॉफीच्या व्यापारावर एकहाती हुकमत गाजवण्यात यशस्वी होतो की नाही ते मुळातूनच वाचण्यात मजा आहे. पण ह्या निमित्ताने थोड्या अनवट धाटणीच्या कादंबरीची ओळख करून द्यायचा हा छोटासा प्रयत्न
पुस्तकाचे नावः कॉफी ट्रेडर
प्रकाशनः बॅलेन्टाईन बुक्स
पृष्ठे: ३८६
किंमत: १७$
Installing Ubuntu 7.10 on External Hard Drive
The download was super fast - actually took about five minutes since I used BitTorrent to download.
I chose Gusty Gibbon - 7.10 build Live CD.
Now, I did not want to split up internal 100GB HDD of the laptop (Dell Latitude D620) nor did I want to mess up Master Boot Record(MBR) for Windows(XP).
Besides, I had a spare 250Gb Fujitsu USB HDD.
So after bit of googling turned up DaBruGo's this post  and Android's this post describing the whole process.
My experiment was based on these and is chronicled below:
Step 1:  Configure the BIOS of the laptop to boot in order: CD-ROM, External HDD, Internal HDD
Step 2:  Load the Live CD, connect the USB drive and let the laptop boot from the CD.
Step 3: Make sure the External HDD is mounted ok (Places->Disk->Double click )
Open a terminal (Applications->Administrartion-> Terminal) and execute
%fdisk -l
This will show the which disk has been assigned which device number. In my case it was /dev/sda for internal HDD while
/dev/sdb for external HDD where I planned to install Ubuntu. The distinction was easy to make due to difference in sizes (Internal
HDD 100 Gb, External HDD 250 Gb). Make a note of the names.
Step 4: Click on "Install" on Desktop. Set appropriate values for
a. Language b. Time Zone etc.
This will bring you to Partitioning step. I chose Guided Partitioning for "Whole Disk"
Be VERY CAREFUL to choose the correct device here (/dev/sdb in my case). There is no undo here!!
Follow the instructions for setting up Computer name, user name, password. Please make a note of it.(The user name and password will
be needed to login once the installation is complete)
Once you see "Advanced" options choose the GRUB loader path from "hd0"  to "/dev/sdb" (The external HDD).
This is very important!! Leaving the GRUB loader path unchanged will cause the installer to over write Windows MBR ("hd0").
Wait until the partitioning is finished.
Step 5:  Follow the reboot prompt and reboot the PC with keeping the Live CD in the drive.
[Note: This is contradictory to Andriod's post but in line with
Debugro's post.]
Step 6:  Mount the External HDD back on(Places-> Disk-> Right click and select "Mount"). Note the complete path to this disk. In my case it was  /media/disk.  Open a terminal and proceed to execute following commands.
% sudo chroot /media/disk
% sudo vim /boot/grub/menu.lst
a. Add # in front of #hidemenu to comment it out.
b. Change a "# groot" line in a section of your menu.lst file
## default grub root device
## e.g. groot=( hd0, 0)
# groot=(hd1,0) - CHANGE THIS LINE TO READ # groot=(hd0,0)
c. Scroll down to  until you get to a section where there is a menu list (not commented out ... no #s) that has Ubuntu mentioned three
times (and possibly an area mentioning Windows XP down below it, if you have XP installed on an internal drive of yours).
There is a line in these three Ubuntu menu choices that has root listed on it and probably has (hd1,0) to the right of it. Change this to
(hd0,0) on all three of these menu choices. Why? Because according to GRUB, the external USB drive will be our first drive (hd0,0) and
not our second  drive (hd1,0) because we loaded GRUB on it's bootsector(Thanks DeBugro!).
Save the file and exit ([Esc] :wq)
Step 7:  Reboot the PC. Take out the LiveCD from the drive. The GRUB should now load from External HDD if everything went well.
Post install Notes. 1. The Ubuntu asked to update lot of pacakges. That is OK. It also asked me to update "Restricted drivers" (For NVDIA graphics
card and Intel Pro Wireless). This was OK but I was totally freaked out when asked to reboot the PC!! Man, this is sooo like
M$FT :(
2. The Firefox that works on Ubuntu is apparently FF 2.0. I tried to install FF 3 from source and it throws up GTK related errors
during when exiting.
3. With root access (using sudo) I created another user. This user login has problems for Sound/ Display settings by GNOME.
This is next AI for me?
Edited on 21st Jan 2010: I upgraded to 9.10 karmic koala via upgrade manager. I should say that this version is almost perfect!!
All things are working just fine for me. The "cube" and other compiz visual effects work out of the box.
The power management (suspend/resume/battery) that was not working in 7.10 (nor in 8.10) works perfectly.
I can also reboot in Windows from GRUB. The Empathy which was broken in 8.10 is also working now. So is CD/DVD R/W drive auto-mounting.
The desktop themes have much wider choice now which though not a must is great!
पुस्तक परिचय -"काबूल इन विंटर"
११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर मी सुन्न झाले होते. (अमेरिकन सामर्थ्याची जणु प्रतिकं असणार्‍या) वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती जमीनदोस्त झाल्यावर आलेलं हरवलेपण मनात घर करून बसलं होतं. ... जॉर्ज बुशच्या सरकारने ह्या हल्ल्यावरचा उपाय म्हणजे हजारो मैल दूर असलेल्या, अनेक दशकांच्या युद्धांनी उध्वस्त झालेल्या एका अफगाणिस्तान नावाच्या देशावर हल्ला करणं हाच आहे असं जेव्हा जाहिर केलं, तेव्हा मात्र त्या मुजोरी बादरायण संबधाने माझ्या मनातल्या भीतीची जागा संतापाने घेतली... "
ऍन जोन्सच्या "काबूल इन विण्टर"  ह्या पुस्तकाची ही सुरवात आपल्या मनाची जी पकड घेते ती शेवटपर्यंत सुटत नाही.
ऍन २००२ साली स्वयंसेवक म्हणून अफगाणिस्तानात गेली आणि पुढची चार वर्षं ती समाजसेवा करत तिथेच राहिली, सामान्य अफगाणी लोकांमधे फिरली, तिनं त्यांना जवळून पाहिलं. हे पुस्तक म्हणजे त्या चार वर्षांचं अनुभव कथन. त्यात वस्तुस्थितीपेक्षा हजारो मैल दूर, वातानुकुलित स्टूडियोमधून, प्रसिद्ध होणार्‍या गुळगुळीत वार्तापत्रांचा बेगडीपणा नाहीये. आहे तो स्वानुभवातून लिहिलेल्या प्रसंगांचा सच्चेपणा. ते वर्णन चटकन मनाला भिडतं कारण ते अफगाणी  मानसिकतेचं आणि तिथल्या समाजाचं जवळून आणि अनेक अंगाने सदर्शन घडवतं.
ऍन जोन्स ही न्युयॉर्क टाईम्ससारख्या अतिप्रतिष्ठेच्या वृत्तपत्रात पत्रकार. व्यवसायात उपयोगी पडणारी संशोधक वृत्ती तिच्या इतर लेखनात सुद्धा सहज जाणवून येते. ३०० पानी असलेल्या ह्या पुस्तकासाठी वापरलेल्या तिने तब्बल पावणेदोनशे संदर्भ वापरले आहेत. पण हे पुस्तक म्हणजे नुसती संदर्भांची जंत्री नाही. हा प्रगाढ्यतेचा आव आणणारा संशोधन-ग्रंथ तर नाहीच नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे हे एक  अनुभवावर आधारलेलं केवळ एक सद्यस्थितीवरचं भाष्य आहे.
पुस्तक ऍनने तीन भागात मांडलं आहे. पहिल्या "इन द स्ट्रीटस्" मधे कायम चालणार्‍या युद्धाने उध्वस्त झालेल्या अफगाणी समाजाचं चित्र, वर्षांनुवर्ष चालत असलेल्या ह्या युद्धांमागचा इतिहास, भिन्न संस्कृती आणि भटक्या टोळ्यांची परस्परांवर कायम वर्चस्व गाजवणारी वृत्ती, ह्या वृतीचा फायदा घेऊन युद्धांच्या भडक्यामधे तेल ओतणारा पाकिस्तानच्या आय-एस-आय चा हात आणि त्याला असणारी सी-आय-ए ह्या अमेरिकन गुप्तहेरखात्याची फूस ऍनने विस्ताराने मांडली आहे.
ह्या भागाच्या पार्श्वभुमीवर ती ओळख करून देते ती काबूलमधल्या स्त्रियांच्या तुरुंगाची - "इन द प्रिझन्स" ह्या भागात.
तुरुंगातल्या स्त्री-कैद्यांवरचे आरोप, आणि तुरुंगात येण्याआधी आणि आल्यानंतर त्यांच्यावर झालेले अत्याचार पाहून स्त्री कैदी आणि पुरूष-आरोपी (बहुतेकवेळा त्या स्त्रीला वेश्याव्यवसायात विकुन तिच्या कमाईवर जगणारा सख्खा भाऊ, वडील नाहीतर उकळतं तेल अंगावर "गंमत" म्हणून फेकणारा नवरा हेच आरोपी!) ह्यांच्यापैकी टोकाच्या पुरूषप्रधान अफगाणी संस्कृतीत नक्की दोषी कोण हा प्रश्न पडतो.
ऍला स्त्री-मुक्तीच्या क्षेत्रात एक आदराचं स्थान आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार(लग्नाच्या चौकटीत आणि चौकटीबाहेर) तिनं तिच्या इतर ७ पुस्तकांमधून मांडले आहेत. साहजिकच, ह्या पुस्तकामधेसुद्धा अफगाणी स्त्रिया आणि त्यांच्यावर नवरा, बाप, भाऊ यांच्याकडून नित्य केले जाणारे अत्याचार, स्त्रीयांचं अफगाणी समाजात असलेलं पायातल्या वाहणेपेक्षाही खालचं स्थान, वारंवार होणार्‍या बाळंतपणांमुळे स्त्रियांचं आजारांनी ग्रस्त असं हलाखीचं आयुष्य (फक्त ४६ वर्षे!) हे आपल्या पांढरपेशी मनाच्या आकलनापलिकडचं आहे. ज्या गोष्टी वाचणं कठीण असे अनुभव जवळून पाहून त्यांचं तटस्थपणे वर्णन करण हे अर्थात येर्‍यागबाळ्याचे काम नोहे.
पण हे पुस्तक म्हणजे स्त्रियांवरच्या अत्याचारांची ओळख ह्यावर थांबत नाही. तिसर्‍या "इन द स्कुलस्" ह्या भागात तिच्या शिक्षणाच्या स्वयंसेवी कामाचे अनुभव आले आहेत. त्या अनुभवांमधे तिच्या प्रौढ शिक्षक-शिक्षण वर्गात असलेल्या स्त्री-पुरुष अशा दोन्हीप्रकारच्या शिक्षक-विद्यार्थ्यांचं बारकाईने केलेलं स्वभावचित्रण येतं. पुढे ह्यातल्या पुरुष-शिक्षक आणि स्त्री-शिक्षकांनी त्यांच्या शिक्षणाचा(त्यांच्यापरीने) कसा उपयोग केला ह्याचा ऍनने केलेला पाठपुरावा आहे. स्वयंसेवी कामासाठी आर्थिक मदत मिळवताना तिला आलेले अनुभव म्हणजे आंतर्राष्ट्रीय स्वयंसेवी आणि बिना-सरकारी संस्था कशा काम करतात, त्यांना मिळणारी लाखो डॉलर्सची मदत कुठुन मिळते, त्या मदतीचा विनिमय कसा होतो हे सगळं ग्रास-रूट लेव्हलवरून केलेलं वर्णनच आहे.
शाळा चालवताना करझाई सरकारच्या न्याय,शिक्षण आणि संस्कृती मंत्रालयात घालावे लागलेले खेटे आणि तिथले अडेलतट्टु, अति-बुरसटलेल्या विचारांचे कारकून/सचिव इतकच काय तर उच्चपदस्थ स्त्री-न्यायाधिशसुद्धा आपल्याला "असं सुद्धा सरकार असतं?" हा विचार राहून राहुन करायला लावतात.
वाचकाला भाषिक सामर्थ्य आणि डोळे उघडवणार्‍या अनुभवांच्या जोरावर घट्ट पकडून ठेवणार्‍या ह्या पुस्तकामधे काही मनोरंजक आणि धमाल विनोदी प्रसंगदेखील आहेत. अफगाणिस्तानचा राष्ट्रीय खेळ असणार्‍या बुझकाशीच्या वर्णनामधून(आठवतो का रँबो-३?) उलगडुन दाखविलेली अफगाणी पुरुषाची मानसिकता ऍनने नर्म विनोदी अंगाने रेखाटली आहे.
या पुस्तकात, कुठेही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची घाई नाही. लेखिकेनं परिस्थितीचं बरचसं समतोल आणि वस्तुनिष्ट वर्णन करत वाचकासमोर एक गुंतागुंतीचं आणि अनेक बारकावे असलेलं चित्र उभं केलं आहे. मी "बरचसं समतोल" अशासाठी म्हटलं,की ऍनचा डाव्या विचारसरणीचा मवाळ (डेमॉक्रॅटिक)स्वभाव स्पष्टपणे दिसतो. त्यात तिचे जॉर्ज बुश सारख्या कट्टर उजव्या आणि भांडवलशाही विचाराच्या सरकार वर ओढलेले ताशेरे (खुद्द बुशचा उल्लेख सुद्धा "कनिष्ट बुश"/बुश द लेसर असा उपहासात्मक येतो.) लपून राहत नाही. पण ह्या निमित्ताने अमेरिकेतले(किंवा एकुणच पाश्चिमात्य जगात), विशिष्ट राजकिय विचारसरणीची उघडपणे बाजु घेऊन भाष्य करणारे टिव्ही चॅनल्स, वृत्तपत्रे हे "व्यावसायिक पत्रकारितेचं", (भारतात सहसा न पाहायला मिळणारं) वेगळ जग समोर आणतात.
एकुण काय, हे पुस्तक वाचल्यानंतर "आजचा अफगाणी समाज" म्हणजे काय हे जाणवतंच पण त्याबरोबर एखाद्या कसबी विणकराने आपल्यासमोर अनेक बारकाव्यांचं चित्रण करणारा गालिचा झरझर विणून दाखवावा आणि आपण थक्क होऊन पाहत राहावं असं वाटत राहतं.
पुस्तकाचे नावः काबूल इन विंटर
लेखिका: ऍन जोन्स.
प्रकाशकः पिकॅडॉर प्रकाशन, न्युयॉर्क
पृष्ठे: ३२१
किंमतः १४$
टीपः चांगल्या पुस्तकाचा आस्वाद घ्यायला भाषेची आडकाठी येत नाही असं म्हणतात. हे पुस्तक मुळ इंग्रजीतून आहे. माझ्या माहितीप्रमाणे मराठी अनुवाद अजुनतरी उपलब्ध नाहीये.
असाही एक व्हॅलेंटाइन ...
पूर्व आशियातल्या इलेट्रॉनिक्स आणि भ्रमणध्वनि बनविणार्‍या प्रसिद्ध संस्थेच्या एका संशोधन-आणि-नवनिर्मिती विभागात चाललेला हा संवाद.
ह्या विभागाने आमच्या संस्थेची आज्ञाप्रणाली वापरायला नुकतीच सुरवात केली आहे. त्यामुळे आज्ञाप्रणाली वापरताना तिथल्या अभियंत्यांना आलेल्या अडचणी सोडवणे, प्रणालीतल्या त्रुटींचे निवारण आदी कामानिमित्त माझे इथे गेले काही महीने दररोज जाणे येणे होते. कामाच्याबरोबरीने आमच्या इतरही गप्पा-टप्पा होतात.
हुशार आणि कष्टाळू अश्या अभियंत्यांचा हा गट मोठा दिलखुलास वृत्तीचा आहे! कामाच्या वेळी मान मोडून काम करणारी ही तरूण मंडळी शनि-रवि च्या दिवशी(आणि रात्री) अगदी बेभान होउन मौजमजा करताना आढळतील. समिष आहार आणि वारूणीच्या संगतीने रात्री उशीरापर्यंत रंगलेल्या गप्पाटप्पा. त्यानंतर कराओके वरची गाणी आणि मग दिवस उजाडायच्यावेळी दमलेल्या अवस्थेत घरी जाणे, रविवार पूर्ण झोपेत(का गुंगीत?)काढणे  हातर त्यांचा शिरस्ताच म्हणाना! अशा गटात काही वेगळा विषय दिसतोय म्हणून मी सुद्धा कान टवकारून ऐकायला लागलो.
"अरे आपला गट दरवर्षी स्वतःचा काही वेळ वेगळ्या कामासाठी देतो. गेल्या तीन वर्षांपासून आपण सगळे प्योंगतेक नावाच्या उपनगरात जातो आहोत." श्रीकांत नुकताच ह्या गटात नोकरीवर रूजू झाला होता त्यामुळे श्री. पार्क त्याला पार्श्वभुमी समजावत होते. "तिथे शहरापासून जरासे आडबाजूला एक मानसिक अपंगत्व आलेल्या मुलांसाठी चालवली जाणारी एक सेवाभावी संस्था आहे. त्या संस्थेमधे जाउन एक दिवसभर जायचे आणि पडेल ते काम करायचे येत्या शनिवारी."
"मी आलो तर चालेल का? मलासुद्धा आवडेल तिथे यायला" मी विचारले. "हो चालेल की! अरे आनंदच होइल आम्हाला अजून एक जण सामिल झाला तर" पार्क म्हणाले. लगेच बसभाडे आणि दुपारच्या जेवणाची फी अशी जुजबी रक्कम मी भरून टाकली.
होता होता शनिवार(१४ फे.) उजाडला. बसने साधारण एक तासाच्या अंतरावर असलेल्या संस्थेत आम्ही दाखल झालो. झाडून सगळे अभियंते आले होते(स्वेच्छेने, सक्तीने नव्हे!)
"या.. या.. बरं वाटलं आलात ते... आपलं स्वागत आहे!" संस्थेचे संचालक आणि संचालिका (बहुदा पतिपत्नी असावेत) आमचं अर्ध्या वाटेवर येउन स्वागत करत होते. सगळे संस्थेच्या सभागृहात गेलो. स्थिरावल्यावर, संचालिकाबाईंनी पुन्हा एकदा आमचे तिथेआ ल्यावद्दल आभार मानले. (नव्या लोकांसाठी) संस्थेची आणि कामाची थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली. ती संस्था गेली २० वर्षं उदार दाते आणि काही मोजके पूर्णवेळ कार्यकर्ते ह्यांच्या आधारावर, सरकारच्या मदतीविना चालू होती. सध्या तिथे ४५ मुले राहतात. सरासरी वय (शारिरीक) ३५-४० एव्हढे आहे(मानसिक अपंगत्व आलेल्या व्यक्तिचे मानसिकआणि शारिरीक वय ह्यात कमालीची तफावत असते.). त्यातल्या त्यात काही मुलींची स्थिती अवघड आहे. ढकलखुर्चीच्या(व्हिलचेअर) मदतीशिवाय त्यांना कुठेही हालचाल करायला पर्याय नाही.
२-३ मुला-मुलींच्या गटाला एक अशा १५-१६ खोल्या आहेत. खोल्या म्हणजे पक्कं बांधकाम नाहीच. शिपींग कंटेनरसारख्या तकलादू पत्र्याच्या त्या खोल्या. मुख्य सभागृहाच्या एका भिंतीवर भावी दुमजली इमारतीच्या पक्क्या बांधकामाचा आराखडा चिकटवलेला दिसला. पण जमिनीच्या आकाशाला भिडलेल्या किंमती आणि बांधकामाचा सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचा खर्च ह्या मुळे दुर्दैवाने हे काम केवळ आराखड्यापर्यंतच येउन नंतर पैशाअभावी रखडले आहे. (इथल्या हाडं गोठवणार्‍या थंडीत धडधाकट लोकांची फेफे उडते त्यात ह्या अशा घरात राहणार्‍या मुला-मुलींची काय अवस्था होत असेल हा विचार करवत नाही.)
पण मूळ बांधकाम सोडले तर बाकी सोयी मात्र वाखाणण्या सारख्या होत्या. मुख्य सभागृहात रक्त दाब मोजायचे अद्ययावत यंत्र, कमरेचा व्यायाम करायची उपकरणे अशा सुविधा, मनोरंजनासाठी ४२ इंची टिव्ही, चित्रतबकडी-चालक (डिव्हिडी प्लेयर), ख्रिस्ताची प्रार्थना करण्यासाठी असलेला पियानो सुद्धा दिसला. बाहेर आवारात कुठल्याही व्यायाम शाळेत असतात त्या तोडीची साधने होती. मी आवर्जून त्यांचे स्वयंपाक घर पाहिला गेलो. एका छोटेखानी संस्थेला लागेल आणि ४०-५० माणसांचा स्वयंपाक दोन तासामधे सहज होइल अशी सर्व उपकरणे, तसराळी, भांडी, गरम/थंड अशा दोन्ही पाण्याची सोय तिथे दिसली. स्वयंपाकघरात कुठेच समिष आहार किंवा मासे इ. चे पदार्थ शिजवल्यावर येणारा विशिष्ट वास जाणवला नाही. निसरड्या जमिनीवरून घसरू नये म्हणून रबराचा लेपसुद्धा दिला होता. राहायच्या खोल्यांमधेजमीन गरम राहण्याची सोय, नेटकी आवरलेली कपाटे, काही खुर्च्या होत्या. असो.
लवकरच संचालिकाबाईंनी आम्हाला कामाची वाटणी करून दिली. मी आणि इतर काही सहकारी संस्थेच्या भाजीपाल्याच्या वाफ्यात गेलो. तिथे पत्रे, लोखंडी तुळया इ. वापरून उगवलेला भाजी पाला साठवण्यासाठी एक शेड उभारली. अर्थात आमच्या सारख्या नवख्या लोकांना हे काम करायला ४ तास सहज लागले.
मधे जेवणासाठी विश्रांती घेतली. हे जेवण आमच्याचपैकी काही मुलींनी बनविले होते. संस्थेतल्या सगळया लोकांची आणि आमची एकच अंगत-पंगत. नंतर उरलेले काम संपवून आम्ही परत जायला निघालो.
निरोप द्यायला संस्थेतली मुले आणि संचालक द्वयी रस्त्यापर्यंत आले होते. परत आम्ही संध्याकाळी शहरात येउन पोहोचलो.
ह्यात पहिला ३-४ मिनीटाचा संचालिका बाईंनी करून दिलेला परिचय सोडला तर कुठेही भाषणे नव्हती की कुणाचा बडेजाव नव्हता. अतिशय साधेपणाने आणि चटपटीत पद्धतीने केलेली कामे आणि इतर दिवशी मुक्त चैनीचे जिवन जगणारी तरूण पिढीची तितक्याच झोकून देउन स्वयंसेवा करायची वृत्ती असा परदेशप्रवासात सहसा न येणारा असा एक वेगळाच अनुभव घेउन मी घरी आलो.
खाली काही काढलेली छायाचित्रे. (चित्रांचा दर्जा काही चांगला नाही त्याबद्दल क्षमस्व.)
१. परिचय करून देताना संचालिका
२. संस्थेतला एक मुलगा
३. आम्ही उभारत असलेला मंडप
चव्हाट्या(वर)चे प्रेमप्रकरण
तसे पहायला गेलो तर मी ओर्कुट, फेसबुक आणि तत्सम समूह-संकेतस्थळांवर नावा पुरती हजेरी लावतो खरा, पण वावर फार नसल्यातच जमा. अहो दररोज प्रत्यक्ष दिसणारे तेच ते मित्र/मैत्रिणी इथेही पुन्हा भेटणार आणि "अरे, कसा काय? इकडे कुठे? हल्ली काय करतोस?" अश्या शिळोप्याच्या गप्पा मारणार. ह्या गप्पा काय, ईमेल नाहीतर फोनवरून सुद्धा आपण मारतोच की त्यासाठी एका वेगळ्या संकेतस्थळावर जायची गरज काय? शिवाय समूह-संकेतस्थळांवर अपेक्षित असते ती विचारांची देवाणघेबाण, नव्या ओळखी ती इथे नसतेच. ह्याचे कारण मुळात त्या-त्या संकेतस्थळांच्या बांधणीत आणि मांडणीत आहे. खरडवही हा त्यांचा पाया त्यामुळे, आपल्याला जो कोणी खरड लिहील तो (किंव्हा आपण ज्याला खरड लिहू तो) काय म्हणतोय ह्या पलिकडे फारशी देवाणघेवाण होतच नाही. अर्थात तिथेही "समूह" असतात, नाही असे नाही पण ते सुद्धा विषयावार. त्यामुळे कुठल्याही अशा समूहात एकापेक्षा अधिक जास्त विषयांवर होणार्‍या चर्चांची मांडणी ही फक्त मोठ्ठी यादी असते. तिथे येणार्‍या व्यक्तिला रुचेल/पटकन कळेल अशा स्वरुपाची केलेली नसते.
असो. तर अशा अनेक संकेतस्थळांमध्ये आणि मिसळ-पावमध्ये काय फरक असणार हा माझ्या मनातला पहिला विचार (दुसरे म्हणजे, आंतरजालावर संकेतस्थळांची "झाले ही बहु, होतील ही बहु" अशीच गत असते. "या सम हाच" सोडाच पण चिमण्यांच्या थव्यासारखी "काल होते इथे...आज गेले कुठे"हीच नश्वर अवस्था फार). तर ह्या पार्श्वभुमीवर मी मिसळ-पावला भेट द्यायला फारसा उत्सुक नव्हतो. तरी सुद्धा एकदोन आठवड्यांनी, घाईघाईतका होइना भेट देवूनही पाहिली होती. एकूण संकेतस्थळाचे नाव आणि मुखपृष्ठावरचे मिसळीचे तोंडाला पाणी सुटवणारे चित्र पाहून थोडी गंमतसुध्दा वाटली. पण तो उत्साह तिथवंरच टिकला.
काही दिवसांनी माझ्या स्वतःच्या संकेतस्थळावर मराठी लेखनाचा श्री गणेशा कर्‍ण्याच्या निमित्ताने गमभन चा निर्माता ओंकारची ओळख झाली. तेव्हा मिपाच्या मांडणीचा/लेखनाचा संर्दभ घ्यायला मिपावर फेरफटका मारत असे. अशाच एका संध्याकाळी जेवणाची वेळ झाली होती. बाहेर थंडी मी म्हणत होती (उणे ६-७ अंश तापमान आणि सुसाट वारा). मी "बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी" ह्या न्यायाने एकटाच (आणि भुकेला) बसलो होतो. अशा अवस्थेत सहज मिपा उघडले आणि समोर पांथस्थांची सचित्र रुई माछ भापे - (वाफवलेला रोहु मासा)" ही जिवघेणी पाककृती दिसली. खरं सांगतो, त्याक्षणी मी अक्षरशः भुईसपाट झालो! (बाय द वे, पांथस्थांना अशा सचित्र पा.कृ. मिपावर प्रसिध्द करून हाहाकार उडविण्याबद्दल काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावणे गरजेचे आहे.)
मी जन्माने भट, पण देवी-मंगेशीच्या कृपेने आमचे सगळे शेजारी सारस्वत होते त्यामुळे पापलेट-वरणभात/कोळंबीचे कालवण/मटणाचा खिमा इ. माझे विशेष जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्या विषयातला एक जादुगार मिपावर असा अवचित भेटल्यावर माझा मिपाबद्दलचा आदर वाढीस लागला.
त्यानंतर मी आणखी काही हाती लागले तर पाहूया अशा विचाराने थोडा जास्त वेळ मिपावर घालवायला लागलो. आणि हाहा म्हणता तात्यांची "दळवी"-इश्टाइल बरीचशी हृद्य आणि थोडीशी आंबट अशी व्यक्तिचित्रे, पुस्तक परीक्षणे, शास्त्रीय संगीत/राजकारणावरच्या नित्य रंगलेल्या चर्चा, प्रवास वर्णने(आणि हो, अगदी "बाचाबाची" पर्यंत येणारी भांडणेसुद्धा) अश्या अस्सल मराठी माणसाला आपुलकी वाटणार्‍या गोष्टींचा हा एव्हढा खजिना हाती लागला. शाळेच्या ग्रंथालयात नविन आलेल्या पुस्तकांची शेल्फं बघून व्हायची तशी अवस्था झाली माझी.
काही मिपाकर मंडळींच्या खरडवह्यांमध्ये "आम्ही मिपा वर दिवसाचे किमानपक्षी दहाएक तास घालवतो" अशा काही नोंदी आहेत त्यात काही अतिशयोक्ति नाही याची मग खात्री पटली.
मी सुद्धा हल्ली मिपावर पडिक असतो. वाटलच तर चाललेल्या चर्चांमध्ये भाग घ्यावा नाहीतर जुन्या नोंदी वाचित राहावे - पाहता पाहता दिवस कसा निघून जातो हे कळतही नाही. आणि ह्या उपर कंटाळा आलाच तर सोबतीला पोट दुखेपर्यंत हसवणारा जैनांच्या कार्ट्याचा आणि अवलिया इ.चा टारगटपणा, ३_१४ व्यस्त अदिती चा लवंगी मिरचीचा ठसका आणि प्रा. डॉ. चा गमतीशीर पण आढात्यखोर नसलेला "प्राज्ञ" पणा हा असतोच.
ह्या सगळ्याला एकत्र बांधून ठेवणारा दुवा म्हणजे मराठीतून मुक्त अभिव्यक्ति("ओंकार जोशी झिंदाबाद...!!") करण्याची सोय(आणि मुभा!) आणि वापरायला सहज-सोपी अशी निलकांताने केलेली ड्रुपलवर आधारित मांडणी. अर्थात, सरपंच तात्यांचा अदृश्य असा दिपोटीरूपी वावरही तितकाच महत्त्वाचा ("इथं अवांतर नको, ख.व.वर बोलूया... तात्या वराडतो" इति एक मेंबर). तरी अजून संपादक-मंडळ नावाची व्यक्ति काही माझ्या पाहण्यात आलेली नाही. बहुदा, ह्या लेखावर टिका करताना ओळख व्हावी!
पण काही गोष्टी मला अजून तितक्याशा कळलेल्या नाहीत. तांत्रिकगोष्टीं मध्ये, एक प्रर्कषाने जाणविणारी गोष्ट म्हणजे लेखनाचा कच्चा मसुदा साठवून ठेवण्याची सोय इथे मला दिसली नाही. आता एखाद्याला मिपावर भला मोठा लेख लिहीताना ही सोय अतिशय उपयुक्त पडेल ह्यात शंका नाही.
दुसरे म्हणजे मिपा हे एव्हढी येजा असणारे प्रसिद्ध संकेतस्थळ, त्याचा चालविण्याचा खर्च सरपंच स्वतःच्या खिशातून करताना दिसतात. हे धोरण स्तुत्य असले तरी स्वस्त निश्चितच नाही. तर मग ह्यासाठी जाहिराती किंवा अशाच मार्गाचा अवलंब करायला काय हरकत आहे?
अजुन एक - लेख ज्या प्रकारे लिहावा किंवा जी भाषा वापरून चर्चा करावी ह्यांची धोरणे जुन्या लोकांना माहित असतील (कदाचित स्वयंशिस्तसुद्धा असु शकेल...) पण तीच सगळी माहिती मिपावर "वाविप्र" सारख्यासदराखाली प्रसिद्ध करायला हवेत. नविन येणारी सगळीच मंडळी धट असतील असे नाही (एखादा उद्धटही निघायची शक्यता आहे. - आंतरजालावर गोगलगायींपेक्षा "लांडगेच" जास्ती असतात.)
असो. स्फुट लिहावे म्हणून बसलो आणि लेख मारुतीच्या शेपटीसारखा लांबत चालला आहे. तेव्हा उरलेले मिपाबद्दलचे विचार पुन्हा कधीतरी.
आपला,
(प्रेमवीर) विंजिनेर
त.टि.- हा लेख लिहिण्याआधी अभ्यास म्हणून एक-दोन चर्चा सुरू केल्या होत्या. त्या चर्चा म्हटले तर निरूपद्रवी आणि उत्तराची फार अपेक्षा नसलेल्या होत्या. पण राव, म्हणता म्हणता काय एक एक प्रतिसाद मिळाले वा! काही खुसखुशीत तर काही एकदम ठसका लावणारे झणझणीत. पण सगळे एकजात (प्रतिसाद देणार्‍यांच्याही नकळत) मिसळ-पावच्या नावाशी इमान राखणारे - एकदा चव घेतल्यावर प्रेमात पडावे असे. तेव्हा "संपादक मंडळ" अश्या चर्चांची योग्य तेवढीच दखल घेतील याची खात्री आहे.