सईच्या जन्माची बातमी ह्या संकेत स्थळावरुन सगळ्या जगाला केव्हा एकदा सांगतो असे झाले होते.
अर्थात बातमी वेळेवर सांगितली खरी पण तेव्हापासून "मराठीतून अनुदिनी कशी लिहावी" हा डोक्यातला किडा काही जाइना(कारणच सांगयचे झाले तर सई हे नाव मराठीत जेव्ह्ढे छान दिसते तेव्ह्ढे इंग्रजीतुन नाही दिसत बुवा...).
असो, तर शेवटी खटपट करुन जमले एकदाचे... (आणि मग काय विचारता हो? दत्त दर्शनाचा ... आपलं.. अनुदिनी-लेखनाचा आनंद पोटात माझ्या माइना रे माइना")
ह्या खटपटीचा सविस्तर वृतांत येथे आहे.
